Call for participation/mr

From Strategic Planning

सुरवातीचे आवाहन

विकिमिडिया फाउंडेशनने त्याच्या एक वर्ष चालणारी व्यूहात्मक योजना सुरु केली आहे. या योजनेदरम्यान, या परिवारातील सदस्यांना त्यांनी आपले विचार,आपले प्रश्न मांडुन या फाउंडेशन व चळवळीचे भविष्य आखण्याची संधी आहे. चर्चेसाठी, एक जास्तीत जास्त केंद्रीकृत असे क्षेत्र निर्माण करुन, स्ट्रॅटेजी विकि सुरु करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ, व्यूहात्मक योजनेच्या प्रक्रियेचे समावलोकन देत राहील व यात सहभागाचे, अश्या काही प्रश्नांसहीत, ज्यांचे कोणीही उत्तर देउ शकेल, मार्गदर्शनही करू शकेल. तरी तुमच्या सगळ्या सूचनांचे स्वागत आहे व सर्वांना सहभागाचे निमंत्रण आहे.

हे संकेतस्थळ तपासण्यासाठी थोडा वेळ द्या. त्याचे सध्या शक्य तितक्या जास्तीत जास्त भाषेत भाषांतर करण्यात येत आहे;आपल्या स्थानिक भाषेत संदेश मोकळेपणाने द्या, आम्ही त्याचे भाषांतर करुन घेउ.(जर ती भाषा इंग्रजी नसेल तर, कोणती ते कळू द्या!) विकिमीडिया फाउंडेशनबाबत,कोणतेही प्रस्ताव, कोणत्याही भाषेत दिलेले चालतील. या उत्कंठावर्धक प्रक्रियेत सामिल होण्यासाठी थोडा वेळ द्या.

आपल्या प्रतिक्रिया अतिमहत्वाच्या आहेत यात शंका नाही. तुमच्या सहभागाने विकिमीडियाच्या भविष्याचे नियोजन ठरेल. याची व योजनांच्या दिशादर्शनाची चर्चा करा. फाउंडेशन हे योजनांची कामे कसे सोपेपणाने करु शकेल,व या ध्येयासाठी आपण कसा वेळ व स्त्रोत देउ शकाल हे सांगा. फिलीप

(कृपया हा संदेश सर्वत्र पोहोचवा आणि असे संदेश देणार्‍यांना जरा माफ करा.)

व्यापक आवाहन (September 2009)

सहभागाचे आव्हानास सोमवार, २१ सप्टेंबर पर्यंत देण्याबाबत मुदत देण्यात आली आहे. मग मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याबद्दल आवाहन केले जाईल. या अंतर्गत, प्रत्येक विकिमीडिया प्रकल्पावर 'साइट नोटिस' टाकण्यात येईल, त्याबरोबरच,मायकेल स्नो व जिमी वेल्स यांच्या आवाहनास जोडणारा एकदुवा. या आवाहनात, सहभागाच्या अनेक मार्गांची यादी दिली असून, टास्क फोर्स मध्ये जाण्यासाठीचा अर्ज.

या आवाहनात खालील गोष्टींचा समावेश आहे: