Jump to content

Call for participation/Appeal letter/mr

From Strategic Planning

Please note: this text is ready for translation, but please do not distribute it yet.

साधारण एक दशकापेक्षाही कमी काळापूर्वी, विकिपीडिया अस्तित्वातही नव्हता यावर विश्वास ठेवणे कठीणच आहे. सध्या ३३ कोटी व्यक्ती दर महिन्यात विकिपीडियाचा उपयोग करतात ज्याद्वारे विकिपीडिया जगातील सर्वात जास्त वारंवार वापरला जाणारा ज्ञानाचा स्त्रोत ठरला आहे. गेल्या आठ वर्षात लक्षावधी स्वयंसेवकांनी त्याची बांधणी केली व वेगवेगळ्या विकिमीडिया प्रकल्पांचे सुचालन केले.

विकिपीडियाने असे बरेच साध्य केले तरीही, आपणास अश्या जगाची निर्मिती करायची आहे की ज्यात प्रत्येक मनुष्याला जगातील सर्व ज्ञानाची मुक्तपणे देवाणघेवाण करता येईल. या आव्हानास सामोरे जाण्यासाठी व त्यात यश मिळविण्यासाठी आपण कशी तयारी करणार?

सध्या जगाच्या एक पंचमांश लोकसंख्येस आंतरजाल (Internet) उपलब्ध आहे. लाखो स्वयंसेवकांनी विकिमिडिया प्रकल्पांत योगदान केले असले तरी ते जगाच्या लोकसंख्येचे हे पूर्णपणे प्रतिनिधित्व करीत नाहीत. यासाठीच्या ही मुक्त ज्ञानाच्या निर्माणाची व वापराची जगभर पसरणार्‍या जागतीक चळवळीवर काम सुरु करु, तेंव्हा त्यास अनेक पर्याय पुढे येतील. हे समजून घेण्यासाठी आम्ही सुमारे एक वर्ष चालणारी एक व्यूहात्मक योजना विकिमिडिया संस्थे अंतर्गत सुरु केली आहे. यात खालील गोष्टींचा समावेश आहे -

  • सध्याची परिस्थिती काय आहे?
  • पुढील पांच वर्षात आपण कुठवर पोचावे?
  • यासाठी काय करावे लागेल?

या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास आम्हाला मदत करा. त्यांचा शोध घ्या, त्यांचे विश्लेषण करा, आमची दृष्टी व आमच्या मूल्यांच्या दृष्टीकोनातुन ते काय आहेत यावर प्रकाश टाका. ही मदत करण्याचे खालील पाच मार्ग आहेत:

यामुळे तुमच्याशी तुमच्या सवडीने माहितीची देवाणघेवाण करणे सुकर होईल.

  • आपल्या कल्पना प्रकाशित करा.स्ट्रॅटेजी विकिवर त्यासाठी प्रस्ताव लिहा, आपल्या कल्पना लिहा व येथे असलेले प्रस्ताव सुधारण्यास मदत करा.तुमच्या अनुदिनी(ब्लॉग) वर, मेलिंग लिस्ट वर,आणि ट्विटर, फेसबूक अशा तत्सम सामाजिक संस्थळ जाळ्यातील चर्चांच्या माध्यमातून विचार मंथन घडवा. आपल्या अनुदिनीवर #wikimedia दुवे लावा तसेच त्या चर्चांचे दुवे स्ट्रॅटेजी विकिवर द्या अशाने इतरांच्या नजरेस पडतील.
  • व्यूहरचनेबद्दल परिसंवाद आयोजित करा. चांगल्या योजना तयार करण्यासाठी आम्हास विस्तृत सहभाग हवा आहे. विकिमिडियाच्या भविष्याबद्दल चांगल्या कल्पना डोक्यात असणार्‍या सर्व लोकांशी टास्क फोर्सेस बोलू शकतीलच असे नव्हे. येथे तुम्ही मदत करु शकता : स्वतःस यजमान समजून, व्युहरचनेबद्दल स्वतःच संवाद (वैयक्तिक रीत्या वा ऑनलाईन) घडवा व त्याचा निकाल स्ट्रॅटेजी विकिवर प्रकाशित करा. स्ट्रॅटेजी सत्रे आयोजित करण्यासाठी स्ट्रॅटेजी विकिवर साधने व साचे सापडतील.
  • आमच्याशी बोला. व्यूहरचना चमूला तुमचे मत कळवा. या पकल्पासाठी तुमच्या कल्पना, तुमच्या अपेक्षा,तुमची भीती, तुमचे उद्दीष्ट आम्हास सांगा.strategywikimedia.org या पत्त्यावर इ-मेल पाठवा.

जर आपण सहभागी होउ शकत नसाल, तर आपण या अत्यावश्यक प्रकल्पास देणगी देण्याबद्दल विचार कराल काय? आपली देणगी आमच्या वैश्विक मुक्त ज्ञान विषयक योजनांना सोपा आधार पुरवेल. आम्हास आमच्या प्रकल्पांतील आमचे तंत्रज्ञान सुधरविण्यास तसेच आमच्या कामास इतर विवीध तर्‍हेने आधार देण्यास स्वयंसेवक सुद्धा हवे आहेत.

या शतकात, आम्हास आपली संस्कृती बदलण्यास आणि सर्व मानवांसाठी एकसारख्या संधी निर्माण करण्याची विस्मयकारक संधी दिलेली आहे. आम्हास वाटते की, जगातील प्रत्येकाने ज्ञानदानाच्या या कामात आमच्या सोबत यावे.


आपला
मायकेल स्नो
अध्यक्ष,विकिमिडिया फाउंडेशन
जिमी वेल्स
संस्थापक,विकिपीडिया तसेच विकिमिडिया फाउंडेशन

Email responder

विकिमिडिया फाउंडेशनच्या व्यूहात्मक विकास चमूला इ-मेल पाठवण्याबद्दल धन्यवाद.आपली इ-मेल मिळाली आहे व लवकरात लवकर वाचली जाईल.आम्ही 'टास्क फोर्स' साठी निवड झालेल्यांसोबत आम्ही लवकरच संपर्क करु. स्ट्रॅटेजी विकि(http://strategy.wikimedia.org) या संकेतस्थळावरील साहित्य वापरुन तुम्ही स्वतःही 'टास्क फोर्स' निर्माण करण्यास मोकळे आहात.आपले शोधनिकाल व शिफारसी आम्हास जरुर पाठवा.

आपण मदत करण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल धन्यवाद व शुभेच्छेसह,

आपला,



Sitenotice

  • mr/मराठी (progress)
  • {{SITENAME}}चे आणि तीच्या सहप्रकल्पांचे भविष्य साकारण्यास सहाय्य करा ! <br /> जिमी वेल्स आणि माईकेल स्नो यांचे<a href="http://volunteer.wikimedia.org">पत्र वाचा</a> .

Title

माईकेल स्नो आणि जिमी वेल्स यांचे पत्र वाचा.